Tuesday, October 6, 2020

वक्तृत्व स्पर्धा

*" माहितीचा अधिकार "सप्ताह*
०६/१०/२०२० - १२/२०/२०२०

माहितीचा अधिकार सप्ताह अंतर्गत राज्यशास्त्र विभाग, श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजाद्वारे 
        *" वक्तृत्व स्पर्धा "* 
      चे आयोजन करण्यात आले आहे.  
                  *-विषय-*
       *लोकशाहीचा आधार - माहितीचा अधिकार* 

 *नियमावली* :-
१. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
२. स्पर्धा श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजामधील बी.ए. (राज्यशास्त्र) च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठीच आहे.
३. स्पर्धेसाठी कमाल ५ ते ७ मिनिटांचे भाषण व्हिडिओ रेकॉर्ड करुन हा व्हिडिओ आपण मंगळवार, दिनांक १० ऑक्टोबर, २०२० पर्यंत खाली दिलेल्या व्हाट्सएप नंबर वर पाठवावा. 
४. भाषणाचा व्हिडिओ ७ मिनिटांपेक्षा अधिक वेळेचा असल्यास स्वीकारला जाणार नाही.
५. दिलेल्या विषयांपैकी स्पर्धकांने साधा- सरळ पण दर्जेदार व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायचा आहे. रेकॉर्डिंग करताना स्क्रीन आडवी (Landscape) असावी. पुरेसा उजेड, सुस्पष्ट आवाज याची पुरेशी काळजी घ्यावी. एडिटेड व्हिडिओ स्पर्धेतून तत्काळ बाद केले जातील (व्हिडिओ सलग असावा. पॉज/ ब्रेक/ व्हिडिओ मर्ज केलेला नसावा) याची प्राधान्याने नोंद घ्यावी.
६. व्हिडिओच्या सुरुवातीस स्वतःचे पूर्ण नाव, वर्ग, महाविद्यालयाचे नाव ही माहिती सांगून भाषणास सुरुवात करावी.
७. विषय आकलन, आशय, मांडणी आणि शैली हे मुद्दे स्पर्धकाने लक्षात घ्यावे.
८. प्रत्येकास भाषणाचा एकच  व्हिडिओ  पाठवता येईल.
९. स्पर्धेसंबंधी सर्व अंतिम अधिकार संयोजकांनी राखून ठेवलेले आहेत.
१०. व्हिडिओमध्ये कोणतेही प्रक्षोभक भाष्य, जातीयवादी भूमिका किंवा वादग्रस्त विधान असणार नाही, याचे भान प्रत्येक स्पर्धकाने राखावे. तसेच आपल्या बोलण्यातून/ भाषणातून कोणताही वाद निर्माण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी.
११. नियुक्त परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्राप्त व्हिडिओवरुनच निकाल जाहीर करण्यात येईल.  
१२. स्पर्धेच्या संदर्भातील कोणत्याही नियम व अटीत  ऐनवेळी बदल करण्याचा वा स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय संयोजकांनी स्वत:कडे राखून ठेवला आहे.
१३. स्पर्धा ही केवळ मराठी भाषेतच होईल. 
१४. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ई - प्रमाणपत्र ( E - certificate ) देण्यात येईल. 
१५. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ राज्यशास्त्र अध्ययन व संशोधन मंच बुलडाणा द्वारे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठविल्या जातील.

*व्हिडिओ पाठविण्याची अंतिम* *दिनांक* : -
१० ऑक्टोबर, 2020 

*पारितोषिके*:-

 प्रथम क्रमांक - 401/- रु.

द्वितीय क्रमांक - 301/- रु. 



*अधिक माहिती करिता विद्यार्थ्यांनी*
डॉ. अनंत आवटी यांच्याशी संपर्क साधावा आणि  9421395187 या व्हाट्सएप नंबर वर व्हीडिओ पाठवावा.

डॉ. अनंत आवटी, 
प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा